
छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील व निजामशाही – आदिलशाहीतील एक मातब्बर सरदार. ऐतिहासिक कागदपत्रांत त्यांचा शाहजी किंवा स्याहजी असाही नामोल्लेख आढळतो. त्यांच्या जन्मतारखेविषयी एकमत नाही. बहुतेक तज्ज्ञ बिकानेर आणि जोधपूर येथील उपलब्ध जन्मपत्रिकांतील तारीख (१६ मार्च १५९९) ग्राह्य धरतात. भोसले घराण्यातील मालोजी व उमाबाई या दांपत्यापोटी शहाजींचा जन्म झाला. शरीफजी हा शहाजींचा धाकटा भाऊ. मालोजी हे निजामशाहीच्या नोकरीतील एक सरदार. भोसल्यांकडे हिंगणी, देऊळगाव, बेरडी इ. गावांची पाटीलकी होती. मालोजी १६१०-११ दरम्यान इंदापूर येथे झालेल्या एका लढाईत मारले गेले. तेव्हा निजामशाहीने मालोजींचा ‘मोकासा’ त्यांच्या मुलांना दिला. मालोजींचा भाऊ विठोजी यांनी मुलांचे संगोपन केले. पुढे विठोजींच्या मृत्यूनंतर (१६२३) शहाजी स्वतःच मोकाशाचा कारभार पाहू लागले. शहाजींचा पहिला विवाह निजामशाहीतील एक सरदार व सिंदखेडचे पिढीजात देशमुख लखूजी जाधव यांच्या ⇨ जिजाबाई या कन्येशी झाला (१६०९). त्यांना सहा अपत्ये झाली.त्यांपैकी संभाजी व शिवाजी वगळता अन्य अपत्ये अल्पायुषी ठरली.
संभाजी कर्नाटकात कनकगिरीच्या लढाईत (१६५४) मरण पावले. तुकाबाई आणि नरसाबाई या शहाजींच्या आणखी दोन बायका. शहाजींचे दुसरे लग्न मोहिते घराण्यातील तुकाबाईंशी झाले. त्यांचे पुत्र व्यंकोजीराजे पुढे तंजावरच्या गादीवर आले. शहाजींनी निजामशाहीचा वझीर मलिक अंबर याला सहकार्य करून आदिलशाहीविरुद्धच्या भातवडीच्या लढाईत पराक्रम केला (१६२४); मात्र त्यात त्यांचे भाऊ शरीफजी धारातीर्थी पडले. त्यानंतर मलिक अंबर आणि शहाजी यांच्या आपापसांतील मतभेदांमुळे शहाजी निजामशाही सोडून आदिलशाहीस मिळाले; परंतु १६२७ मध्ये इब्राहिम आदिलशाहच्या मृत्यूनंतर पुन्हा ते निजामशाहीत आले (१६२८). निजामशाहीत सासरे लखूजी यांचा खून झाल्यानंतर शहाजी काही दिवस चाकण-पुणे परगण्यांत जाऊन राहिले आणि नंतर मोगलांकडे गेले. मोगलांनी त्यांना पाच हजारी मनसबदार नेमले; परंतु शाहजहान बादशाहाचा निजामशाही बुडविण्याचा हेतू लक्षात येताच शहाजींनी मोगलांना सोडून निजामशाही कुळातील एका मुलास गादीवर बसवून पेणगिरीस निजामशाहीची स्वतंत्र सत्ता स्थापन केली (१६३२). त्यासाठी त्यांनी विजापूरकरांशी मैत्रीचा तह केला.
शहाजींनी दक्षिणेत नीरेपासून उत्तरेत चांदवडच्या डोंगरापर्यंतच प्रदेश आणि पूर्वेस अहमदनगरपासून पश्चिमेस उत्तर कोकणापर्यंतचा भाग आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. निजामशाही टिकविण्याचे त्यांनी आटोकाट प्रयत्न केले; तथापि शाहजहानने अखेर निजामशाही खालसा केली (१६३६). त्यानंतर शहाजींनी आदिलशाहीत नोकरी धरली (१६३६). आदिलशहाने त्यांना ‘सरलष्कर’ व ‘महाराज’ या पदव्या दिल्या. आदिलशहाने त्यांच्याकडे असलेले पुणे-सुपे ही जहागीर तशीच ठेवली. त्यानंतर शहाजींनी प्रदेश विस्ताराचे धोरण अंगीकारून आपले वर्चस्व वाढविले. तेव्हा मुहंमद आदिलशहाने कर्नाटकात जहागीर देऊन तिकडे त्यांची रवानगी केली (१६३७). शिवाजी महाराजांचे कारनामे पाहून आदिलशहाने शहाजी राजांना फसवून बंदिस्त केले. त्यावेळेस त्याला वाटले कि शिवाजी हे सर्व शहाजी राजांच्या सांगण्यावरूनच करीत आहे. आदिलशहाने शिवाजी महाराजांना आणि त्यांचे भाऊ संभाजी महाराजांना नियंत्रणात ठेवण्यासाठी दोनदा त्यांच्यासमवेत युद्ध केले पण शिवाजी महाराजांनी आदिलशहाच्या सैन्याला युद्धात पूर्णपणे हरविले होते. काही काळानंतर आदिलशहाने शहाजी राजांना बंदिवासातून मुक्त केले.
एका युध्दा दरम्यान अफजल खानाने केलेल्या विश्वासघातामुळे शिवाजी महाराजांचा मोठा भाऊ संभाजी मारल्या गेला. तेंव्हा स्वतः शिवाजी महाराजांनी अफजल खानास यमसदनी पाठविले. सुरुवातीच्या काही युद्धांमध्ये शहाजी राजांनी शिवाजी महाराजांना सर्वतोपरी मदत केली. विशेषतः अफजल खाना विरुद्ध झालेल्या युद्धात शहाजी राजांनी स्वतः शिवाजी महाराजांचे मार्गदर्शन केले होते. पुढे 1665 मध्ये घोड्यावरून पडल्याने शहाजी राजांचा मृत्यू झाला. पराक्रमी…निडर…शूरवीर शहाजी राजांनी भोसले घराण्याचे नांव मोठ्या उंचीवर पोहोचविले तंजोर, कोल्हापूर, आणि साताऱ्याचा पूर्ण प्रदेश भोसले घराण्याच्या नियंत्रणाखाली होता. मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ छत्रपती शिवरायांनी केली हे आपणा सर्वांनाच ठाऊक आहे परंतु हे देखील आपल्याला माहिती आहे की कुठल्याही मोठ्या कार्याची सुरुवात ही छोट्या कार्याने होत असते. अगदी त्याच प्रमाणे शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे स्वप्नं पूर्ण करण्यात शहाजी राजांचे योगदान हे बहुमूल्य होते. बालपणापासून शिवाजी महाराजां समवेत आपल्या सगळ्या मुलांना शहाजी राजांनी उत्तम प्रशिक्षण दीले होते, त्यामुळे त्यांची मुलं उत्कृष्ट प्रशासक आणि योद्धा होऊ शकलीत. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना आपली सभ्यता आणि संस्कृतीशी देखील त्यांनी अवगत केले, त्यामुळे मजबूत हिंदवी स्वराज्याची स्थापना होऊ शकली. जर शहाजी राजे नसते तर छत्रपती शिवाजी महाराज देखील आपल्याला कळले नसते.
कर्नाटकात पेनुकोंडे, बसवपटनम, होस्पेट, बिदनूर, श्रीरंगपटण वगैरे ठिकाणांच्या पाळेगारांविरुद्ध शहाजींनी मोहिमा आखून तो प्रदेश आदिलशाही अमलाखाली आणला (१६३७– ४८). या कामगिरीबद्दल त्यांना बंगलोरची जहागीर देण्यात आली. ते दुसरी पत्नी तुकाबाईंसह बंगलोरला राहू लागले. `महाराज फर्जंद शहाजी भोसले’ या किताबाने आदिलशहाने त्यांचा सन्मान केला. शिवाजींच्या स्वराज्यविषयक हालचालींमुळे आदिलशहा, मोगल व शहाजी ह्यांत वितुष्ट आले. शहाजी व शिवाजी यांचा बंदोबस्त करण्यासाठी शहाजी जिंजीच्या वेढ्यात गुंतले असता त्यांना २६ जुलै १६४८ रोजी अचानक कैद करण्यात आले. शिवाजी महाराजांनी शाहजहानचा मुलगा मुराद याच्या मार्फत आदिलशहावर दबाव आणून शहाजींची सुटका केली (१६ मे १६४९). ह्या बदल्यात संभाजींना बंगलोर व शिवाजींना कोंडाणा (सिंहगड) आदिलशहाला द्यावे लागले. सुटकेनंतर शहाजींकडे पूर्ववत कर्नाटकचा कारभार सोपविण्यात आला. त्यांनी नलेंगापट्टम, पाटॉनोव्हो, तंजावर, वेल्लोर वगैरे गावे हस्तगत करून जणू स्वतंत्र राज्य निर्माण केले होते. कर्नाटकात कोलार, बंगलोर, अर्काट, बाळापूर व शिरे हे भाग त्यांना आदिलशहाकडून जहागीर म्हणून मिळाले. त्यांनी सर्व हिंदू पाळेगारांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला.
आपल्या करता शहाजी राजे कुठल्याही प्रकारचा धोका उत्पन्न करू नये यासाठी शहाजहाने जाणीवपूर्वक त्यांना दक्षिणेत पाठविले. परंतु तेथे देखील शहाजी राजांनी आपल्यातील कौशल्याने आदिलशाहीत उच्च पद प्राप्त केले. शहाजी राजांना बंगळूरूला पाठविण्यात आले, ते त्या ठिकाणची जहांगिरी सांभाळीत होते. शहाजी राजांच्या आयुष्यातील हा देखील एक काळ होता. 1638 साली विजापूर सैन्याचे नेतृत्व करतांना रानादुल्ला खान आणि शहाजी राजांनी केम्पे गोडा 3 ला युद्धात पूर्णता पराजित केले. त्यानंतर शहाजी राजांना बंगलोर ची जहांगिरी बहाल करण्यात आली. स्वतःच्या नेतृत्वात शहाजी राजांनी अनेक युद्ध लढली आणि दक्षिणेकडील अनेक राजांना युद्धात मात दिली. शहाजी राजांनी युद्धात मात दिलेल्या राजांना दंड अथवा देहदंड न देता सर्वांना माफ केले व त्यांच्यासमवेत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून वेळ पडल्यास त्यांच्याकडून लष्करीसैन्याची मदत घेण्याचे आश्वासन प्राप्त केले.
बंगलोर येथून पुढे शहाजी राजांच्या जीवनाची वेगळी सुरुवात पाहायला मिळते. पत्नी जिजाबाई आणि लहानश्या शिवाजीला त्यांनी पुण्याची जहांगिरी संभाळण्याकरता पुणे येथे पाठविले. शहाजी राजांवर सुलतानाचा पूर्ण विश्वास होता. शहाजी राजांना ते राज्याचा आधार मानीत असत, परंतु काही काळ लोटल्यानंतर शिवाजी महाराजांनी पुण्याच्या आजूबाजूस ज्या प्रदेशावर आदिलशहाचे नियंत्रण होते तो प्रदेश काबीज करण्यास सुरुवात केली.