
जिजाबाई ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.
जीवन
शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली.राजांच्या प्रथम पत्नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढेच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज-सोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते. राजांच्या सर्व स्वार्यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वतः राज्याची धुरा वहात. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णत: जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली.
शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून, इ.स. १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले,या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे. जिजाबाई ही आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्या राजमाता होय.
भोसले व जाधवांचे वैर
पुढे लखुजी जाधव व शहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला, एकदा एक हत्ती पिसाळला होता, हत्तीस पकडण्यास २ पथके तयार केली पहिले जाधवांचे त्याचे नेतॄत्व दत्ताजीराव जाधव लखुजी जाधव यांचा मुलगा व जिजाबाई यांचा भाऊ. दुसरे पथक भोसले यांचे त्याचे नेतृत्व शरफोजी भोसले शहाजीराजे भोसले यांचे बंधू करत होते. यात दोघांचे भांडण झाले व संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले. हे लखुजी जाधवास समजताच त्यांनी रागाने संभाजी भोसले यांस ठार केले.हे सर्व शहाजीराजांना समजताच ते समशेर घेऊन सासर्यावर चालून आले यात शहाजीराजे भोसल्यांच्या दंडावर वार लागला या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले.[२] नात्यांना, भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपूर उतरला होता
शिवाजी महाराजांवरचे संस्कार आणि राज्यकारभाराची जवाबदारी
राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्याच प्रेरणेने कानंद, गुंजन, वेळगंड मोसे खोर्यातील वीर बाजी पासलकर, झुंजारराव मारळ, तानाजी मालुसरे आदी अठरापगड जातीच्या 600 तरूण संवगड्यांना सोबत रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. मोठ्या युक्तीने जिजाऊंच्या मार्गदर्शनामध्ये अत्यंत मुत्सद्देगिरीने बिना लढाई किल्लेदार पळून गेला असे आदिलशाहीला कळवून पहिला किल्ला तोरणा ताब्यात घेतला. तोरण्याची डागडुजी सुरू असतांना देवदेवतांच्या सोन्याच्या मुर्ती सापडल्या, या मुर्तींचे काय जिजाऊंनी सल्ला दिला,“या मुर्ती देवाच्या असल्या तरी सोन्याच्या आहेत हे विसरू नका, या मुर्ती वितळवा आणि स्वराज्यतील मावळेरुपी जिवंत देव घडवा, हा महाराष्ट्र मुक्त करा.” पुढे निजामशाहीचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा ह्याच्याशी स्वराज्य उभारणीबाबत चर्चा करुन नरसाळा किल्ला मिळविला. चाकणचा किल्लेदार सुद्धा स्वराज्याच्याच विचाराने प्रेरित होऊन स्वराज्यात दाखल झाला. रक्ताचा थेंबही न सांडता तीन किल्ले लोकांच्या उस्फुर्त पाठींब्यातुन मिळाले.
लोकांना स्वराज्य पाहिजे आहे हे स्पष्ट झाले, पुढे कोंढाण्याच्या मुसलमान किल्लेदाराला भरपूर पैसे देऊन गड ताब्यात घेतला. शहाजीराजांची परंपरागत जहाँगिरी होती पुणे, सुपे, बारामती, इंदापूर आणि शिरोळ या जहाँगिरीच्या सुरक्षिततेसाठी पुरंदर किल्ला स्वराज्यात असणे किती गरजेचे आहे, हे माँसाहेब जिजाऊंनी पटवून दिले. ऐन दिवाळीच्या दिवशीच पुरंदरचा किल्ला स्वराज्यात आला. व जिजाऊ माँसाहेबांच्या उपस्थितीत शिवरायांनी खरीखुरी दिवाळी साजरी केली. त्यामुळे शहाजीराजे शिवरायांना मदत करीत असल्याचा संशय आला जिंजीच्या मोहिमेवर गेलेल्या शहाजीराजांना वेल्लोर येथे अचानक झडप घालून आदिलशाहाने कैद करविले. आदिलशहाने दोन्ही पुत्रांचा बंदोबस्त करण्यासाठी मुर्रादखान व फतेहखान यांना पाठविले. फतेह खानाने बाळाजी हैबतराव या ब्राम्हण सरदाराच्या मदतीने अगदी सहज सुभानमंगळ किल्ला जिंकला म्हणून मोठ्या आनंदाने विजयोत्सव साजरा करुन झोपले अश्या वेळी मल्हार कावजीच्या नेतृत्वात मावळ्यांनी अर्ध्या तासात बाळाजी हैबतरावची फौज कापून काढली. स्वतः मल्हार कावजीच्या भाल्याने बाळाजी हैबतराव खाली पडला. उरलेले खानाचे सैन्य पळु लागले जे जीवंत सापडले ते शरण आले व स्वराज्यात मावळे म्हणून दाखल झाले. खानाचा खजिना, नव्या दमाचे 500 घोडे मिळाले व हीच रसद पुढे खानाच्या पराभवासाठी वापरली.
महाराजांनी खानाच्या बोलसद, शिरवळ छावणीवर हल्ले करुन खानाला डिवचले. खानाने पुरंदरवर चाल केली, खानाचे सैन्य पुरंदरवर अर्ध्यापर्यंत चढल्यावर अचानक दरवाजा उघडून खानाच्या सैन्यावर हल्ला चढविला आणि खानाचे सैन्य कापून काढले. खानाचा सासवडपर्यंत पाठलाग केला, तिकडे संभाजी राजांनी सुद्धा हिंदू राजांना एकत्रित करून फर्राबखानाची धुळधाण उडविली, अश्याप्रकारे आदिलशहाला जिजाऊ माँसाहेबांच्या दोन्ही पुत्रांनी तडाखेबंद उत्तर दिले. जिजाऊंच्या सल्ल्यानुसार शिवाजी महाराजांनी मोगलांचा दक्षिणेतील सुभेदार मुराद बक्ष यांच्याशी संधान साधले व आदिलशाहीला मोगलांकडून फर्मान आले “ शहाजीराजे भोसले आमचा माणूस आहे, शिवाजी भोसले आमच्या सेवेत आहे, त्याचे वडील शहाजीराजे यांना तातडीने मुक्त करावे” त्यामुळे शहाजीराजेंची सन्मानपूर्वक सुटका करण्यात आली, आदिलशहाला मोठी चूक झाल्याचे कळून चुकले आणि त्याने शहाजीराजेंना दरबारात बढती देऊन फर्जंद पदावर घेतले, या संपूर्ण प्रकरणामागे माँसाहेब जिजाऊंची मुत्सद्दीगिरी कारणीभूत ठरली. 25 जुलै 1629 ला निजामाने विश्वासघाताने भर दरबारात वडील राजे लखुजीराव, भाऊ अचलोजी व राघोजी आणि भाचा यशवंतराव या चौघा कुटुंबियांना एकाच वेळी खुन केला. तेव्हापासून जिजाऊ माँसाहेबांनी स्वराज्य निर्मितीचा ध्यास घेवून अखंड सावधानता बाळगली. निजामाच्या दरबाराची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये म्हणून एकाच वेळी चार ठिकाणी स्वराज्याचे चारधाम चार शक्तिस्थळे निर्माण केली.
छत्रपती शिवराय लहानाचे मोठे आपल्या आईच्या छत्रछायेखाली झाले. त्याची संपुर्ण जवाबदारी जिजामातेन स्वतः उचलली. त्यांच्यावर अतिशय उत्तम संस्कार करून त्यांना घडवलं.शहाजी महाराजांनी जिजामातेवर पुण्याची जवाबदारी सोपवल्याने त्या शिवाजी महाराजांसमवेत पुणे येथे आल्या. शत्रुचे सततचे हल्ले पुण्यावर होत असल्याने पुण्याची जोखीम वाढली होती परंतु दादोजी कोंडदेवांच्या मदतीने त्यांनी पुण्याची जवाबदारी समर्थपणे पेलली. पुण्याचा विकास, राज्यकारभार हाताळणे, शेतक.यांना मदत करणे, तंटे सोडवणे, यांसारख्या जवाबदा.या पार पाडतांना त्या शिवाजी महाराजांच्या जडण घडणीकडे देखील बारकाईने लक्ष देत.शिवाजी महाराजांना कर्तृत्ववान योध्यांच्या गोष्टी सांगणे, राम कृष्णाच्या, बलाढय आणि पराक्रमी भिम अर्जुनाच्या गोष्टी सांगुन त्यांच्यावर संस्कार करीत होत्या व शस्त्रविद्येत त्यांना निपुण करतांना दादोजी कोंडदेवांसोबत स्वतःदेखील बारकाईने लक्ष ठेवत होत्या.
शिवाजी महाराजांवर संस्कार करत असतांना त्यांनी त्यांना कर्तव्याबरोबरच राजनिती देखील शिकवली. न्याय करतांना समान करावा आणि अपराध करणा.याला कठोरात कठोर शासन करतांना देखील तयार असावे हे संस्कार जिजामातेने महाराजांवर बिंबवले. मोठया मोहिमांवर जेव्हा शिवराय जात तेव्हां राज्यकारभारावर जिजामाता स्वतः लक्ष ठेवत. शहाजी राजे बंगळुर येथे चाकरीवर असतांना त्या शिवाजी महाराजांच्या आई वडिल दोन्ही ही झाल्या. नेटाने आणि धैर्याने राज्यकारभार सांभाळला. सईबाईंच्या अकाली जाण्याने संभाजीराजांची जवाबदारी सुध्दा समर्थपण पेलली. राजांच्या लढायांचा, युध्दांचा, स्वा.यांचा सर्व तपशील स्वतः ठेवायच्या. महाराजांच्या मुत्सद्देगिरीत, खलबतांमधे स्वतः जातीने लक्ष घालायच्या. वेळप्रसंगी योग्य सल्ला द्यायच्या. शिवाजी महाराजांना आग्रा येथे जेव्हां कैद झाली होती त्यावेळी उतारवयात देखील जिजाउं माॅं साहेबांनी राज्याची जवाबदारी अतिशय समर्थपणे पेलली. आपल्या मनात असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना त्यांनी महाराजांकरवी पुर्ण करून घेतली आणि त्याकरता त्यांनी तसे संस्काराचे बीज महाराजांमधे पेरले. महाराजा देखील आईच्या सर्व आदेशांना जागले आणि म्हणुन हिंदवी स्वराज्य प्रत्यक्षात अवतरले