
शून्यातून जग निर्माण करणारे व्यक्तिमत्व
सुभाष रुणवाल हे रुणवाल ग्रुपचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. हे भारतीय रियल इस्टेट उद्योजक आहेत. मुंबईतील नामांकित बिल्डर्स मध्ये हा एक व्यक्ती फक्त सामान्य माणूस होता.
सुभाष रुणवाल हे एक प्रशिक्षित अकाउंटंट, यांचा जन्म महाराष्ट्रातील धुळे शहरात झाला आणि वयाच्या एकविसाव्या वर्षी ते मुंबईला स्थायिक झाले.
रुणवाल यांची दृष्टी अकाउंटन्सी च्या पलीकडे गेली आणि रिअल इस्टेट क्षेत्रात त्यांना रस निर्माण झाला. सुभाष रुणवाल यांची रणनीती पूर्णपणे भिन्न होती त्यांनी घेतलेला पहीला भूखंड ठाण्यात 22 एकर जमीन होता, त्यांच्या कामाची सुरुवात ठाण्यात कीर्तिकर अपार्टमेंट पासून झाली, जी ठाण्यात दहा हजार स्क्वेअर फूट अपार्टमेंट ब्लॉक होती. पुढे त्यांनी कामा कुटुंबातून जमीन घेतली व्यवसायाची उन्माद समजून घेण्याची क्षमता आणि परोपकारी बनण्याची इच्छा, यामुळेच त्यांना यशोगाथा मिळाली. त्यांची दृष्टी केवळ पैसे कमवण्याचा पुरती मर्यादित नव्हती तर ते लोकांचे मन जिंकण्यात पर्यंत मर्यादित होती त्यांच्या कामाचा मोठेपणा आता मुंबईत दिसून येतो.
कौटुंबिक माहिती
त्यांचे लग्न चंदा यांच्याशी झाले त्यांना दोन मुले आहेत, संदीप, सुबोध आणि एक मुलगी संगीता आहे. त्यांची मुले १९९५ मध्ये या व्यवसायात सामील झाली. रुणवाल ग्रुपच्या वाढीसाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे. यशस्वीतेसाठी त्यांनी आपली पत्नी चंदा यांचा उल्लेख प्रशिक्षित बायोकेमिस्टचा असा केला आहे.
शून्यातून श्रीमंत होण्याचे जीवन परिवर्तन
सुभाष रुणवाल यांनी आजोबांचा दागिन्यांचा व्यवसाय कमी होतांना पाहिले आणि त्यांच्या परिवाराने धडपड केली. आजपर्यंत त्यांची संपत्ती एक अब्ज डॉलर्स आहे, ते जेव्हा कामात उतरले हे घर एक खोलीचे स्वयंपाक घर होते. आज तो माणूस मुंबईतील यशस्वी आणि निवासी प्रकल्पांच्या मागे उभा आहे.
पुरस्कार
भारतीय राष्ट्रपती यांच्या हस्ते समाज रत्न पुरस्कार.
रुणवाल गार्डन चा आयकॉनिक टाऊनशिप ऑफ द इयर हा पुरस्कार.
संघटना
सुभाष जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेचे अध्यक्ष व भारत जैन महामंडळाचे अध्यक्ष आणि जागतिक जैन फाउंडेशन चे कोषाध्यक्ष म्हणून काम करतात. ते महावीर जैन फाउंडेशन आणि रनवाल एज्युकेशन फाउंडेशनचे विश्वस्त आहेत.
निकिता अहिरे
१३/०५/२०२०